Chhagan Bhujbal । भाजपने महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करुन बराच कालावधी उलटला तरी अद्याप महायुतीच्या अंतिम जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. परंतु, आता येत्या 24 तासांमध्ये महायुतीचे जागावाटप मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात असतांना आता महायुतीत जागावाटपावरून नवीन वाद समोर येत आहे .
मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गटातील छगन भुजबळ यांनी नाशिक येथून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. वृत्तानुसार, भुजबळांकडून लोकसभेची चाचपणी केली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या वादात नशिकच्या जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी केली जात आहे. छगन भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
काही दिवसापूर्वीही नाशिक लोकसभा मतदार संघ चर्चेत आला होता कारण, मुख्यमंत्री श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून शिंदे गटाच्या नेते, खासदार हेमंड गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. भाजप पक्षामधून नेत्यांनी नाशिकमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवाय आता छगन भुजबळदेखील निवडणूक लढण्यासाठी चाचपणी करत असल्याची माहिती आहे.
Chhagan Bhujbal । नाशिकची जागा भाजपला हवी ?
मिळालेल्या माहितीनुसार,हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं आहे अशी मोठी घोषणा श्रीकांत शिंदे यांनी केली असली तरी भाजप पक्षाला देखील नाशिक लोकसभेची जागा हवी आहे. भाजपमधील काही नेत्यांना नाशिक येथून लोकसभेसाठी तिकीट हवं आहे. तर गेल्या १० वर्षाचा इतिहास बघता नाशिक लोकसभेवर हेमंत गोडसे हे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत.
महायुतीच्या जागावाटपावरुन सुरु असलेल्या विविध चर्चांमुळे हेमंत गोडसे यांची धाकधूक वाढली होती. आपलं लोकसभेचं तिकीट कापलं जाणार तर नाही ना? अशी हेमंत गोडसे यांना धाकधूक असल्याची चर्चा होती. पण आता थेट श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केल्याने हेमंत गोडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र भाजप आणि शिंदे गटात या जागेवरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचलं का ? हटके प्रचार…! “मुलाच्या लग्नात ‘गिफ्ट’ आणू नका पण, मोदींना ‘मत’ द्या”लग्नपत्रिका ‘व्हायरल’