लंडन – अवघ्या ८ महिन्यांचं मूल म्हणजे नुकतेच कुठे रांगायला शिकलेलं असतं, त्याला नीट बोलताही येत नसतं. असं असतानाही एवढंसं मूल लाखो रुपये कमवत असेल तर कुणाला विश्वास बसणार नाही. त्यामुळेच अवघ्या 8 महिन्यांची एम जे नावाच्या चिमुकलीने फक्त 5 महिन्यांत 3 लाख रुपये कमवले आहेत, हा विषय चर्चेत आला आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, एमजेचं नशीब इतकं चांगलं आहे की लहान वयातच संपत्ती आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवून दिली आहे. फक्त 5 महिन्यांत तिनं 3 लाख रुपये कमवले आहेत. एमजेची आई सारा लुट्झकर नर्स आहे. एमजेनं जन्मानंतर ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला. जेव्हा ती फक्त 5 महिन्यांची होती, तेव्हा सारानं तिचे फोटो मॉडेलिंग एजन्सीला पाठवले होते. तिथून वॉलमार्ट आणि कॉस्टको या दोन मोठ्या अमेरिकन कंपन्यांसाठी एमजेची निवड झाली. तिनं लगेचच साडेतीन लाख रुपये कमावले. आता ती 8 महिन्यांची आहे आणि इतर अनेक ब्रँडसाठी फोटोशूट देखील करते, ज्यामुळे ती चांगली कमाई करत आहे.
आई सारा सांगते की तिची मुलगी एमजे खूप आनंदी आहे आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेते. अडीच महिन्यांपासून तिचे फोटो मॉडेलिंग एजन्सींना पाठवले जाऊ लागले कारण साराच्या एका मैत्रिणीच्या दोन्ही मुली मॉडेलिंग करत आहेत. आता एम जे फक्त 4-5 मिनिटांच्या फोटोशूटमध्ये चांगले पैसे आणि नाव कमावत आहे. मॉडेलिंग एजन्सी तिच्या असाइनमेंटमधील 20 टक्के कपात घेते आणि उर्वरित पैसे मुलीला दिले जातात. सोशल मीडिया टिकटॉकवरही तिचे हजारो फॉलोअर्स आहेत.ती मोठी झाल्यावर तिला पुढे करायचं आणि काय नाही हे ती स्वतः ठरवेल, असंही सारा म्हणाली.