मुंबई – आपल्यावरील कारवाईच्या संबंधात लोकसभा अध्यक्षांकडे तसेच दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी आता तुरूंगात आपल्याला स्पॉन्डिलायसीसचा त्रास सुरू झाल्याची तक्रार भायखळा कारागृह अधिक्षकांकडे केली आहे.
तुरुंगात सतत बसून आणि जमिनीवर पडून राहिल्याने आपला हा विकार बळावत आहे असे त्यांनी म्हटले आहे.त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने ही तक्रार केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, राणांचा सीटी स्कॅन करणे आवश्यक आहे जेणेकरुन डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीचे गांभीर्य समजू शकेल.
तथापि तुरुंग प्रशासनाने यासाठी परवानगी नाकारली. वेळीच निदान न झाल्याने राणाची प्रकृती बिघडली तर त्याला तुरुंग प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवि राणा यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या जामीनाचा निर्णय अजून झालेला नाही.