Lok Sabha Election 2024 । महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ विरोध केला जातोय. नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून महायुतीतील नेते नाराज असल्याचेही दिसून आले आहे.
सुरवाती पासूनच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीचा विरोध केला आहे. अशात पुन्हा एकदा त्यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू
‘दिनेश बूब हा माणूस रवी राणांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. चित्रपटाचे जर दृश्य काढले तर त्यात तुम्ही दारू पिताना दिसतात. रवी राणांनी इतक्या व्यक्तिगत पातळीवर खाली जाऊन आमच्या उमेदवारावर आरोप करू नये. ज्याचं घर मातीचं आहे, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर रवी राणांचा असेल. नवनीत राणाच्या पराभवाचे सर्वात मोठे श्रेयही रवी राणांना जाईल. रवी राणा व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती.’ असेही कडू म्हणाले आहे.
कोण आहेत नवनीत राणा?
नवनीत राणा यांचा जन्म मुंबईतील पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. यानंतर त्यांनी अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले. याशिवाय तिने कन्नड, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी ‘दर्शन’ या कन्नड चित्रपटातून पदार्पण केले. नवनीत कौरने 2011 मध्ये रवी राणासोबत सामूहिक विवाह मंडपात विवाह केला. योगगुरू रामदेव बाबांच्या आश्रमात त्यांची भेट झाली.
हे वाचला का ? संजय राऊतांची टीका,’मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचा…’