कोरोनाच्या संकटात उत्तराखंडात निसर्गाचा प्रकोप; ढगफुटीसदृश पावसामुळे इमारती जमीनदोस्त

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे उत्तराखंडमध्ये आता आणखी एक संकट धडकले आहे. उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा मंगळवारी ढगफुटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. देवप्रयाग येथे झालेल्या या ढगफुटीसदृश पावसामुळे इमारती जमीनदोस्त झालय असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तराखंडमधील नगरपालिकेचे बहुउद्देशीय भवन आणि आयटीआयची इमारत या ढगफुटीमुळं जमीनदोस्त झाली. उत्तराखंडमधील टेहरी गढवाल जिल्ह्यात असणाऱ्या देवप्रयाग मार्केट परिसरात यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि या शक्तिशाली प्रवाहामुळे काही इमारती, घरं, दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मुख्यमंत्री तिर्थ सिंह रावत यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सदर घटनेनंतर त्यांनी तातडीने माहिती मागवली असून, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतला. देवप्रयाग पोलिस स्थानकातील अधिकारी महिपाल सिंह रावत यांनी दिलल्या माहितीनुसार या भागातील बरीच दुकानं बंद होती. कोरोना काळातील संचारबंदीमुळं इथं नागरिकांची वर्दळही कमीच होती. तरीही, आपत्तीचे गांभीर्य पाहता इथे शोध मोहिमही राबवण्यात आली होती.

जिल्हा व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देवप्रयागमधील उंचावर असणाऱ्या भागामध्ये सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही ढगफुटीची घटना घडली. ज्यामुळे गडेरा या नदीप्रवाहात पाण्याची पातळी अचानकच वाढली. या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळं वाटेत आलेल्या इमातींचे नुकसान झाले आणि हा मातीचा लोट अलखनंदा नदीत मिसळला गेला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.