टीकाकारांवर सोनू निगम भडकला

गायक सोनू निगमने काही दिवसांपूर्वीच रक्‍तदान करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याने युवकांनाही रक्‍तदान करण्याचे आवाहन केले होते. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

 

मात्र, त्यावेळी सोनूने मास्क घातलेला नव्हता म्हणून काहीजणांनी त्याच्यावर शेरेबाजी केली होती. या टीकेवर सोनू चांगलाच भडकला आहे. त्याने टीकाकारांना उद्देशून आइन्स्टाइन असे संबोधले. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

टीका करण्यासाठी आपण स्वतःची पातळी किती खालावत आहोत याचा विचार करा आणि अशी बडबड करणे बंद करा, असे तो म्हणाला. सोनूने अलीकडेच जुहूमध्ये एका रक्‍तदान शिबिराचे उद्‌घाटन केले होते. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

त्याने 250 ऑक्‍सिजन कॅनिस्टर मुंबई महापालिकेला दान केल्या आहेत तसेच ऍम्ब्युलन्सही दान केली आहे. मदत करण्यासाठी आपण पुढाकार घेतला केवळ दाखवण्यासाठी केले नाही हे लक्षात ठेवावे, असेही त्याने टीकाकारांना उत्तर देताना म्हटले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.