पुणे – लखनौ (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत पुण्याजवळील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ संचलित गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरातील कस्तुरी संदीप चव्हाण या विद्यार्थिनीने १४ वर्षाखालील गटामध्ये ४ बाय १०० मीटर रिले या क्रीडा प्रकारात विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करून सुवर्णपदक पटकाविले, अशी माहिती मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक, क्रीडा प्रमुख बबन गुळवे यांनी दिली.
BWF Malaysia Open 2024 : किदाम्बी श्रीकांतची दुसऱ्या फेरीत धडक…
या राष्ट्रीय स्पर्धेत कस्तुरी हिला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती.यापूर्वी तिने चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. क्रीडाशिक्षक बबन गुळवे, राहुल नवले, कावजी भवारी बाबासाहेब वळकुंदे, साहेबराव गाळव यांनी तीला मार्गदर्शन केले.