पुणे :- पर्णवी मोहळकर, शरयू रांजणे, अरुंधती कंवर यांनी अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून १५ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू आहे.
या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या दुसऱ्या फेरीत पर्णवीने समीक्षा दोडकेवर २१-१८, २१-१८ असा, शरयूने सानिका बागळेवर २१-४, २१-७ असा विजय मिळवला.
BWF Malaysia Open 2024 : किदाम्बी श्रीकांतची दुसऱ्या फेरीत धडक…
अरुंधतीने दर्शना माळीवर २१-५, २१-१० अशी, तर पदमश्री पिल्लईने शर्वरी वरवंटकरवर २१-१४, २१-८ अशी मात केली. सोयरा शेलारने चारुता गोडबोलेचा २१-६, २१-६ असा, तर मौसम पाटीलने अनन्या माळूनजकरचा २१-१६, २१-१२ असा पराभव केला.