BWF Malaysia Open 2024 : भारताच्या किदाम्बी श्रीकांतने मंगळवारी क्वालालंपूर येथे इंडोनेशियन जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीचा पराभव करून मलेशिया ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
किदाम्बी श्रीकांतने 2018 च्या आशियाई क्रीडा चॅम्पियनविरुद्ध सुरुवातीचा गेम गमावला, परंतु त्यानंतरच्या दोन्ही गेममध्ये 65 मिनिटे चाललेल्या सामन्यात 12-21, 21-18, 21-16 असा विजय नोंदवला.
किदाम्बी श्रीकांतचा क्रिस्टीवर 12 सामन्यांमधला हा सातवा विजय ठरला. माजी जागतिक नंबर 1 किदाम्बी पुढील फेरीत पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 20 व्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगच्या एनजी काई लाँग एंगसशी भिडणार आहे.
Asian Olympic qualifiers shooting : भारतीय नेमबाज वरुणसह ईशाने मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…
तर दुसरीकडे अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो या महिला दुहेरीच्या जोडीने, ज्यांनी गेल्या वर्षी अबू धाबी आणि गुवाहाटी मास्टर्सचे विजेतेपद पटकावले होते, त्यांनी 2024 च्या बॅडमिंटन मोसमाचीही शानदार सुरुवात केली आणि अमेरिकन जोडी अॅलिसन ली ओर आणि फ्रान्सिस्का कॉर्बेट यांचा 21-13, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला.