नाशिक पुन्हा हादरले! अज्ञाताकडून भाजप नेत्याची हत्या; पाच दिवसातील तिसरा खून

मुंबई : नाशिकमध्ये मागील पाच दिवसात तिसरा खून झाल्याची धक्कादायक घटना  समोर आली आहे . आज सकाळी नाशिकमध्ये सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा खून झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने अमोल यांना फोन करून बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. तसेच शहरातील पोलिसांच्या गस्ती बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये हत्येचे सत्र सुरूच आहे. नाशिकमधील विविध भागात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, त्यामुळे नाशिकमधील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

गेल्य काही दिवसांपूर्वी म्हसरुळला सराईत गुन्हेगाराची तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आल्याची घटना घडली होती. दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ एका भाजी विक्रेत्याची डोक्यावर दगड टाकून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.