Coronavirus India : नवीन व्हेरिएंट मुळे वाढली चिंता; 24 तासांत 488 जणांचा मृत्यू, 10 हजार नवीन रुग्ण

नवी दिल्ली – देशभरात करोना संसर्गाची प्रकरणे कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा करोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत करोनामुळे मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 10 हजार 549 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 488 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यादरम्यान 9 हजार 868 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र, अजूनही सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख दहा हजारांहून अधिक आहे. करोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे चिंतेत भर पडली आहे.

आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत करोनाचे 10 हजार 549 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, या कालावधीत 488 लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय, भारतात सद्या 1,10,133 सक्रिय करोना रुग्ण आहेत. देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4,59,237 वर पोहोचली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.