Bigg Boss marathi : गायत्री आणि मीरामध्ये जोरदार राडा…; “ये आरडाओरडा कमी कर, बस चल तिकडे’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज दोन खास, जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणजेच गायत्री आणि मीरामध्ये टास्क दरम्यान जोरदार भांडण होताना दिसणार आहे. गायत्रीच्या एका निर्णयामुळे यांची मैत्री तुटणार ?

नक्की काय झाले? या वादावादीमध्ये गायत्रीचा देखील पारा चढला आणि भांडण अजूनच वाढत गेले… नक्की काय झालं हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण, मीराला हार पचवता येतं नाही हे मात्र खरं.

टास्कसाठी सगळेच सदस्य सुंदर तयार होऊन सज्ज आहेत… बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना दोन टिम्समध्ये विभागले आहे म्हणजेच TEAM A आणि TEAM B. कोणती टीम विजयी ठरणार याचा निकाल गायत्री लावणार असे प्रोमोमध्ये दिसून येते आहे. 

घरातील सदस्य छान perform करताना दिसत आहेत… गायत्रीने यामध्ये जाहीर केले, टीम A ला मला हा चान्स द्यावा असं वाटतं आहे. त्यावर मीराने रागाने सांगितले मी स्टेज सोडणार नाही.

वाचा आधी नीट आणि मग सांगा… त्यावर गायत्रीचा पारा देखील चढला आणि ती मीराला म्हणाली, आरडाओरडा कमी कर…बस चल तिकडे. आणि यानंतर वाद वाढतच गेला. बघूया आज घडणार टास्कमध्ये.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.