नाशिक, दि.29 – नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत कोविड कक्षातील 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत शासनाने जाहीर केली होती.
त्याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेल्या 22 रुग्णांपैकी 16 मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले असून, उर्वरित 6 जणांची तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरच त्यांनादेखील धनादेश अदा करण्यात येतील, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.