धोनीच्या आई-वडिलांची करोनाच्या विळख्यातून सुटका

हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

रांची, दि. 29 – भारतात सध्या करोनाने थैमान घातले असून अनेक लोकांना या विषाणूचा विळखा पडला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीच्या आई-वडिलांनादेखील करोनाची लागण झाली होती.

आता धोनीचे आई-वडील हे दोघेही करोनातून बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दोघांचीही करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता या दोघांचीही तब्येत उत्तम असल्याचे सांगण्यात आले.

मागील आठवड्यात 21 एप्रिल रोजी धोनीचे वडील पानसिंह धोनी आणि आई देवकी देवी यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना रांचीमधील बरियातू रोड स्थित पल्स हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

धोनीच्या आई-वडिलांच्या तब्येतीविषयी त्यानंतर हॉस्पिटलने देखील अपडेट दिले होते. हे वृत्त समजताच भारतातून धोनीच्या चाहत्यांकडून त्याचे आई-वडील लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छादेखील आल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.