Fastest Bowl Of IPL 2024 : लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने ( Mayank Yadav ) पंजाब किंग्जविरुद्ध 155.8 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकला. हा या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू होता, परंतु हा विक्रम केवळ 2 दिवसच टिकू शकला.
मुंबई इंडियन्सचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीने ( Gerald Coetzee ) मयंक यादवचा विक्रम मोडला आहे. जेराल्ड कोएत्झीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 157.4 किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकला. मात्र, या चेंडूवर रियान परागने चौकार मारला. यासह कोएत्झीने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू टाकल्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवून घेतला आहे.
आयपीएल 204 मधील सर्वात वेगवान चेंडू…
1. जेराल्ड कोएट्झी विरुद्ध राजस्थान : (157.4) किमी प्रतितास
2. मयंक यादव विरुद्ध पंजाब: (155.8) किमी प्रतितास
3. मयंक यादव विरुद्ध पंजाब: (153.9) किमी प्रतितास
4. मयंक यादव विरुद्ध पंजाब: (153.4) किमी प्रतितास
5. नांद्रे बर्गर विरुद्ध दिल्ली: (153) किमी प्रतितास
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम शॉन टेटच्या नावावर आहे. या वेगवान गोलंदाजाने आयपीएल 2011 मध्ये ताशी 157.71 किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता. मात्र, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी त्या विक्रमाच्या अगदी जवळ आला, पण तो मोडू शकला नाही. मात्र, लॉकी फर्ग्युसनचा विक्रम जेराल्ड कोएत्झीने नक्कीच मागे टाकला.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू…
1. शॉन टेट- 157.71 किमी (2011)
2. जेराल्ड कोएट्झी- 157.4 किमी (2024)
3. लॉकी फर्ग्युसन- 157.3 किमी (2022)
4. उमरान मलिक- 157 किमी (2022)
5. एनरिच नॉर्टजे- 156.22 किमी (2020)
लॉकी फर्ग्युसनने ताशी 157.3 किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात वेगवान चेंडू होता, मात्र आता हा विक्रम जेराल्ड कोएत्झीच्या नावावर नोंदवला गेला आहे.