मुंबई – संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाचे आगमन धुमधडाक्यात झाले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची आराधना सगळेच मनोभावे करत आहेत. संपूर्ण ठिकाणी याचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाची पारंपरिक पद्धतीने अभिनेते ‘नाना पाटेकर’ यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले आहे. यावेळे नानांच्या बरोबर त्यांचा संपूर्ण परिवार देखील उपस्थितीत होता.
दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींकडे देखील आज बाप्पा विराजमान झाले असून अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या लाडक्या बाप्पाचे फोटो पोस्ट केले आहेत.