माढा प्रतिनीधी : माढा तालुक्यातील रोपळे [क] या गावांमध्ये गतवर्षी ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यातआले होते. पावसाच्या पाण्याने ओढा तुडुंब भरला आहे. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हाअध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व केम गावचे सरपंच अजित दादा तळेकर आणी रोपळे गावचे सरपंच तात्यासाहेब गोडगे यांच्या हस्ते तुडुंब भरलेल्या ओढ्यातील पाण्याचे पूजन करुण नारळ फोडून पाण्यात नारळ पुष्पअर्पण करण्यात आला व त्या ओढ्याला विजय गंगा असे नामकरण करण्यात आले.
रोपळे येथील नाम फाउंडेशन च्या सहकार्याने व धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील ओढ्याचे काम सुरू होते. ओढ्याच्या तांत्रिक कामासाठी माननीय श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी पोकलेन मशीन दिली असता रोपळे गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून त्या मशीनला डिझेल पुरवले त्यावेळेस रोपळे गावातील गावातील तंटामुक्ती अध्यक्ष शरद पाटील गावातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते.