शिक्षण समितीच्या बैठकीत निर्णय
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहुतांश शाळांना नावे नाहीत. अनेक शाळांचा उल्लेख हा क्रमांकाने केला जातो. त्यामुळे मसर्व शाळांना थोर महापुरुषांची व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावे देण्यात येणार आहे. त्याला शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. गुरुवारी (दि. 6) शिक्षण समिती सदस्यांची बैठक पार पडली. शिक्षण समिती सभापती मनीषा पवार अध्यक्षस्थानी होत्या.
महापालिकेच्या 123 शाळा आहेत. त्यातील बहुतांश शाळांना नावे देण्यात आलेली नाहीत. महापालिका शाळा मुले क्रमांक 1 किंवा मुली क्रमांक 2 अशा पद्धतीने शाळा ओळखल्या जातात. अथवा या शाळा ज्या भागात आहेत त्या भागाच्या नावावरुन शाळांना ओळखले जाते.
शहरात प्राथमिक विभागाच्या 87, माध्यमिक विभागाच्या 18, हिंदी माध्यम 2, इंग्रजी माध्यम 2 अशा एकूण 123 शाळा आहेत. यापैकी ज्या शाळांना फक्त क्रमांक आहेत अशा सर्व शाळांना महापुरुषांची नावे देण्यात येणार आहेत. यामध्ये ज्या महापुरुषांनी समाजहितासाठी काम केले आहे, ज्यांचे जीवन लहान मुलांसाठी संस्कारासमान ठरते, अशा महापुरुषांची नावे दिली जाणार आहेत. तसेच खेळाडूंचीही नावे शाळांना देण्यात येणार आहे.