पारगाव – पारगाव (ता. दौंड) येथे झालेल्या माऊली अण्णा ताकवणे चषक क्रिकेट स्पर्धेत आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाचा कर्णधार निखिल चव्हाण याने झळाळत्या चषकासह एक लाख रुपयाचे बक्षीस स्वीकारले.
स्पर्धेचे विजेते संघ पुढीलप्रमाणे- प्रथम आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू एक लाख रुपये, द्वितीय तुकाई टायगर्स, पारगाव ६१ हजार, तृतीय ड्रीम इलेव्हन भांडगाव, चतुर्थ- केडगाव स्मॅशर्स केडगाव, सर्वोत्कृष्ट गोलंदाज- रोहित गायके भांडगाव, तर उत्कृष्ट फलंदाज स्वप्निल भालेराव राहू, मालिकावीर प्रथमेश राठोड (पारगाव) यांनी बक्षीस पटकावले.
सामन्यांचे आयोजन वाघजाई माता तरुण मंडळाचे गौरव चव्हाण, गणेश वनशिव, विकास शिशुपाल, किशोर सोनवणे, योगेश वनशिव, काका साबळे, महादेव कांबळे, निलेश शिंदे, सचिन शिशुपाल, अमोल गायकवाड, अमोल चव्हाण, मंगेश गायकवाड,
तुषार शिशुपाल, संकेत आरावडे, सागर चौरे, सोनबा शेलार, रणजित कांबळे, यश साबळे, अविनाश चव्हाण, निलेश आचार्य, शंकर सोनवणे, सूरज गजरे यांनी सुंदर पद्धतीने केले होते. सूत्रसंचालन राहुल टिळेकर यांनी केले. पप्पू शिशुपाल यांनी आभार मानले.