चिंबळी, (वार्ताहर) – भारतीय डाक विभाग व मरकळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मरकळ येथे एक दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये पी. एम. किसान लाभार्थी यांचे नवीन खाते काढण्यात आले.
पाच वर्षांच्या आतील लहान मुलांचे आधार कार्ड मोफत काढून आधारकार्डला मोबाइल नंबर लिंक करण्यात आला. तसेच पोस्ट ऑफिसचा 10 लाख रुपयांचा अपघाती विमा काढून देण्यात आला व पोस्ट ऑफिसच्या विविध आकर्षक योजनांची खाती काढून त्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना पब्लिक प्रोव्हिडंट फंड, रिकरिंग खाते, सेव्हिंग खाते, महिला सन्मान निधी, पोस्टाचा विमा या सर्व योजनांची महिती देण्यात आली.
याप्रसंगी राजगुरूनगर येथील डाकघर निरीक्षक भोगाडे डाक आवेक्षक सागर गुरव, खेडकर, ब्रँच पोस्टमास्तर श्रीमती शेळके, जाधव व सेवा निवृत्त डाक कर्मचारी कोंडीबा वर्पे उपस्थित होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ आदींच्य हस्ते करण्यात आला.