मंचर, (प्रतिनिधी) – आजच्या काळात विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये विज्ञानाधिष्टित दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी केले.
मंचर (ता.आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील ज्युनिअर सायन्स विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. सिनर्जी २०२४ या उपक्रमाअंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धा वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सिनर्जी २०२४ या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास ज्यूनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस. डी. पवळे, सायन्स विभागप्रमुख प्रा. सचिन पवार आणि सिनर्जी प्रकल्प प्रमुख डॉ. उमेश पाटील हे उपस्थित होते.