नेवासा – शालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री.दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकींदपूर येथील १९ वर्ष वयोगटातील संघाने सुवर्ण पदक पटकावले.
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व क्रिडा कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. ११ ते १४ नोव्हेंबर २०२३) रोजी विर सावरकर (रंगोली) मैदान यवतमाळ येथे शालेय १९ वर्ष मुले व मुली यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील विद्यालयाच्या संघाने पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत प्रथम फेरीत लातूर विभाग द्वितीय फेरीत अमरावती विभाग आणि अंतिम सामन्यात छत्रपती संभाजी नगर विभागाला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले.
या पूर्वी २०१९ ला नाशिक येथे झालेल्या शालेय १९ वर्ष कबड्डी स्पर्धेत देखील विद्यालयाच्या संघाने सुवर्णपदक पटकावले होते. अशी कामगिरी करणारे हे जिल्ह्यातील एकमेव विद्यालय आहे. संस्थेचे संस्थापक आदरणीय साहेबरावजी घाडगेपाटील यांनी खेळाडूंना ग्रामीण भागात देखील उच्च प्रतीच्या सुविधा निर्माण करून दिल्यामुळे संस्थेचे अनेक खेळाडू राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा क्रिडा कार्यालयाचे राज्य क्रिडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे यांचे बहुमोल मार्गदर्शन विद्यालयाच्या खेळाडूंना लाभत आहे.
क्रिडा मार्गदर्शक खुरंगे हे नगर जिल्ह्यात आल्यापासून त्यांनी कबड्डी खेळायला चांगल्यापैकी प्रोत्साहन दिले आहे.आणि यामुळे अहमदनगर जिल्ह्याचा कबड्डी खेळाचा आलेख उंचावला आहे.त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक खेळाडू खेलो इंडिया,शालेय राष्ट्रीय स्पर्धा सारख्या अनेक राज्य राष्ट्रीय स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग वाढला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेतील प्राविण्यमुळे अनेक खेळाडू शासकिय सेवेमध्ये रुजू झाले आहेत.
श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालयाच्या या संघाच्या यशस्वी कामगिरी मुळे या संघातील खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत .यशस्वी संघातील खेळाडू पुढील प्रमाणे आशिष वाघ,वेदांत उंदरे ,शुभम बिटके,विशाल ब्रम्हणे,गौरव गटकळ, योगेश खराडे,किरण वाघ,शिवतेज साळुंके,सौरभ शिरसाठ,प्रणव कोरेकर,प्रशांत उपळकर, प्रविण खेडकर, विजयी संघाला राष्ट्रीय खेळाडू प्राचार्य सोपानराव काळे,
गणेश शिंदे,मुकेश जाधव, अशोक पानकडे यांचे प्रशिक्षण लाभत आहे. तसेच क्रीडा प्रशिक्षक संभाजी निकाळजे,अभिजीत दळवी,महादेव काकडे, छबुराव काळे,साहेबराव दाणे सर, संदीप वाघमारे,नितीन चिरमाडे,पदम्राज गायके,माधुरी भोसले यांचे सहकार्य लाभत आहे. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील, अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील, उपाध्यक्ष स्नेहलदीदी चव्हाण – घाडगे पाटील,सचिव मनिष घाडगेपाटील,राष्ट्रीय खेळाडू प्राचार्य सोपानराव काळे,समन्वयक दत्तात्रय वांढेकर,प्राचार्य सचिन कर्डिले,क्रिडा प्रमुख संजयसिंह चौहान,ज्युनिअर विभाग प्रमुख संतोष निंबाळकर,नामदेव ताके,अशोक गाडे,एकनाथ कापसे,मनोहर शेजुळ यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.