Air India : जगभरात मोठी ओळख असणाऱ्या एअर इंडिया या विमान कंपंनीने एक मोठा बदल केला आहे. या कंपनीने त्यांच्या वैमानिक आणि केबिन क्रू यांच्या नवीन गणवेशाचे अनावरण केले आहे. नव्या गणवेशाची पहिली झलक सोशल मीडियाद्वारे नागरिकांना दाखवण्यात आली आहे. डिसेंबर 2023 च्या अखेरपर्यंत हा नवा ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता आहे.
1932 मध्ये सुरु झालेल्या एअर इंडियानं मागील सहा दशकांनंतर अखेर वैमानिक आणि केबिन क्रूसाठी नवा ड्रेसकोड अर्थात सेवेत असतानाचा गणवेश नव्यानं जगासमोर आणला आहे. तब्बल 60 वर्षानंतर हा बदल करण्यात आला आहे. सध्या नव्या बदलाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हा नवा गणवेश प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी हा गणवेश डिझाईन केला आहे. प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी हा गणवेश डिझाईन केला आहे.
Introducing our new Pilot & Cabin crew uniforms, an ode to Air India’s rich history and a promise of a bright future.
These uniforms, envisioned by India’s leading couturier @ManishMalhotra, features three quintessential Indian colours – red, aubergine and gold, representing the… pic.twitter.com/Pt1YBdJlMN
— Air India (@airindia) December 12, 2023
एअर इंडियाने सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महिला आणि पुरुष नवीन गणवेशात दिसत आहेत. ज्यात एअर इंडियातील कर्मचारी नव्या रूपात पाहायला मिळत आहे. हा गणवेश डिझाईन केल्याबद्दल मनीष मल्होत्रा यांनी ही आपल्यासाठीही एक अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया दिली. ‘हे माझं भाग्य आहे की मला एअर इंडियाचे वैमानिक आणि केबिन क्रू यांसाठी गणवेश तयार करण्याची संधी मिळाली. हिंदुस्तानची संस्कृती आणि परंपरेसोबतच आधुनिक लुक देणे हा गणवेश तयार करण्यामागचा माझा उद्देश होता असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनीष मल्होत्रा हे भारतातील प्रसिद्ध डिझायनरपैकी एक मानले जातात. त्यांनी बॉलीवूडमधील मोठमोठ्या कलाकरांचेही ड्रेस डिझाईन केले आहेत.