नगर – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर समाजाचे मागासलेपण तपासण्यात येणार आहे. मराठा कुटुंबाच्या सर्व्हेक्षणा प्रारंभ झाला आहे. त्यासाठी मनपाने ८९८ कर्माचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राज्यभर मराठा कुटूंबांचे सर्व्हेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. येत्या ३१ जानेवारी पर्यंत सर्व्हेक्षणाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाला सादर केला जाणार आहे.
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा कुटूंबांच्या सर्व्हेक्षास सुरूवात झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी या पार्श्वभूमीवर बैठक घेतली आहे. सर्वेक्षण करण्यासाठी ८९८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यात ७५२ कर्मचारी प्रगणक म्हणून, तर ६४ कर्मचारी पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहे. लवकरात लवकर सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाला सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
मराठा कुटूंबांच्या सर्व्हेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूटने ॲप तयार केले आहे. त्यातील प्रश्नावलीनुसार सर्वेक्षण होणार आहे. कुटुंबाची अर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक, कौटूंबिक स्वरूपाची माहिती गोळा करून राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर केला जाणार आहे. शहरासह जिल्ह्यातील सुमारे दहा लाख मराठा कुटूंबांचे सर्व्हेक्षण होऊन त्यातून मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यात येणार आहे. या कामासाठी प्रगणक म्हणून दहा हजार ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरासह जिल्यात एकुण १० लाख कुटूंब सर्वेक्षण
ऐकून अधिकारी – १३०
एकुण प्रगणक – १०,३००
शहरातील प्रगणक – ८९८