नेवासा,( प्रतिनिधी) – ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील कृषीकन्या चैताली निचित, प्रतिक्षा शिंदे, ऋतुजा पोटरे, अश्विनी पवार, सोनाली मुळे यांच्या माध्यमातून अंमळनेर या गावामध्ये माती परीक्षण व क्षारयुक्त जमिनीचे व्यवस्थापन याविषयी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी कृषि महाविद्यालयाचे मा.प्राध्यापक जयसिंग वाघमारे यांनी ग्रामस्थाना मार्गदर्शन केले. उपप्राचार्य सुनील बोरुडे यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. याप्रसंगी कृषि सहाय्यक प्रभाकर बरे, ग्रामसेविका सविता बाचकर, कार्यक्रम समन्वयक डॉ.अतुल दरंदले, कार्यक्रम अधिकारी डॉ.पूजा गिरी, मृदाशास्त्र व रसायन विभाग प्रमुख वरूण कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंमळनेर गावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील आयनर होते.