शेवगाव,(प्रतिनिधी) – श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळा शेवगाव येथील खंडोबा मैदानावर मोठ्या उत्साहात हजारो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भारतीय धर्म, संस्कृती, परंपरा व थोर संतांनी दिलेली शिकवण याची माहिती जनसामान्यांना करून देणे व हिंदू धर्माची जोपासना व ओढ निर्माण करण्यासाठी अशा सोहळ्याचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन आयोजक तथा जिल्हा निरीक्षक सोमेश्वर घोगरे यांनी केले.
भव्य शोभायात्रेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. शोभायात्रेत प्रभू रामचंद्र, सीता, लक्षमण तसेच संत गजानन महाराज असे विविध प्रकारचे देखावे तयार करण्यात आले होते संस्थानच्या प्रवचनकार बाबरताई यांचे प्रवचन झाले.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक पीठ कार्याध्यक्ष प्रवीण ठाकूर, जिल्हाध्यक्ष सागर तिखे, महिला अध्यक्ष छाया ठाकरे, विभागीय निरीक्षक पांढरे, सुरेश राऊत, तालुकाध्यक्ष भिमराव साखरे, कांताताई दळे यांचेसह जिल्ह्यातील सर्व समितीचे पदाधिकारी व अनुयायी उपस्थित होते.