अकोले – अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणून 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने तसेच निवडणूकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी बाहेरून देखील मनुष्यबळाला पाचारण करण्यात आले आहे.
असा असेल पोलिस बंदोबस्त –
१ पोलिस निरिक्षक, ३ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ५ उपनिरीक्षक, ११० पोलिस कर्मचारी व दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी, असे पोलिस बळ बाहेरून पाचारण करण्यात आले आहे. तसेच अकोले, राजुर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, १० होमगार्ड असा मोठा पोलिस बंदोबस्त निवडणुकीसाठी ठेवण्यात आला असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली.
सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, सभासद यांनी शांततेत मतदान करावे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल असे कोणतेही कृत्य करु नये, असे आवाहन प्रभारी पोलिस निरिक्षक मिथुन घुगे यांनी केले आहे.