डेहराडून – उत्तराखंडच्या पौरी येथील एका रिसॉर्टमध्ये महिला रिसेप्शनिस्टच्या हत्येप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलालाही अटक झाल्यानंतर भाजपने विनोद आर्य आणि त्यांचा मुलगा अंकित आर्य यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय गेतला आहे. पक्षाचे मीडिया प्रभारी मनवीर चौहान यांनी शनिवारी सांगितले की, प्रदेश भाजप अध्यक्ष महेंद्र भट्ट यांच्या आदेशानुसार विनोद आर्य आणि अंकित यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
हरिद्वारमधील भाजपचे नेते विनोद आर्य यांनी यापूर्वी राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले उत्तराखंड माती बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. या प्रकरणात विनोद आर्य यांचा मुलगा पुलकीत आर्य हा प्रमुख आरोपी आहे. अंकित हा पुलकितचा भाऊ आहे. अंकित राज्य ओबीसी आयोगाचा उपाध्यक्षही आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत रिसॉर्टचा मालक पुलकीत आर्य,व्यवस्थापक सौरभ भास्कर, सहाय्यक व्यवस्थापक अंकित गुप्ता यांना काल अटक करण्यात आली आहे.