शिरूर- स्वच्छ शिरूर.. सुंदर शिरूर.., मेरा योगदान.. मेरी शान.., स्वच्छ शिरूर मेरी पहचान.., माझ्या शिरूरचा मी स्वच्छता हिरो… अशा घोषणा देत नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत शिरूर शहरात विद्यार्थी आणि नागरिकांची स्वच्छता दौड निघाली.
स्वच्छतेचा जागर करित आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असल्याचा संदेश देणारी दौड शिरूर नगरपरिषदेचा वतीने काढण्यात आली. यात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह विविध राजकीय सामाजिक स्वंयसेवी संस्था संघटनेचे प्रतिनिधी, बोरा महाविद्यालयातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्वच्छता दौँडला नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात झाली. दौंड सुरू होण्यापुर्वी शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयात स्वच्छतेचा संदर्भातील शपथ विद्यार्थी व नागरिकांना देण्यात आली. यावेळी विद्यार्थी संग्राम संतोष शेवाळे, सुदर्शन रामकृष्ण खोडदे, स्मृती संजय भंडारे, आदिती विनेश लाळगे, श्रेया मारुती दरेकर यांनी स्वच्छतेचा संदर्भात मनोगत व्यक्त केले. स्वच्छतादूत म्हणून काहींचा सन्मानही यावेळी करण्यात आला.
यावेळी स्वच्छते संदर्भातील शपथ मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी विद्यार्थी व नागरिकांना दिली. नगराध्यक्षा वैशाली वाखारे, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विनोद भालेराव, सुरेखा शितोळे, नगरसेवक व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, संगीता मल्लाव, मनिषा कालेवार, उज्ज्वला वारे, विठ्ठल पवार, निलेश गाडेकर, अभिजीत पाचर्णे, मुख्याध्यापक अनिल तांबोळी, ऍक्टिव्ह गृपच्या कामिनी बाफना, लता नाझीरकर, सुनंदा लंघे, प्रा. चंद्रकांत धापटे, प्रा. अंबादास केत, पालिकेचे आधिकारी चंद्रकांत पठारे, अय्युब सय्यद, किरण बनकर, संतोष शितोळे, सुशांत कुटे, विजय नरके, प्रा. हरी पवार, वेताळ यांच्यासह विविध संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ही स्वच्छता दौड शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयापासून सुरु झाली शहरातील राम आळी, कापड बाजार, हलवाई चौक, मुंबई बाजार, कुंभार आळी सह उपनगरातून ही गेली दौंड दरम्यान स्वच्छता विषयक विविध घोषणा देण्यात आल्या.
स्वच्छ सर्वेक्षण मोहिम अंतर्गत स्वच्छता संदर्भात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. ओला व सुका कचरा वेगळ्या ठेवावा.
-महेश रोकडे, मुख्याधिकारी शिरूर