प्राची दुधाणे ः वारसा जिजाऊ फाउंडेशनच्या विविध पुरस्कारांचे वितरण
शिरूर -राजमाता जिजाऊ व सावित्रीबाईंच्या संस्करांची समाजाला नितांत गरज आहे. असे प्रतिपादन वारसा जिजाऊ फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षा प्राची दुधाणे यांनी येथे केले. फाउंडेशनच्या वतीने विविध पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले.
जिजाऊ जयंतीनिमित्त वारसा जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुधाने यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमापूर्वी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुजाता पवार, घुणे जिल्हा महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा अर्चना शहा, स्वाती शिंदे , भूमाता ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षा दुर्गा शुके नगरसेविका मनीषा कालेवार वारसा फाउंडेशनच्या शिरूर अध्यक्षा मंजुश्री थोरात, शिल्पा बढे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग अण्णा थोरात, उपनिरीक्षक भगवान पालवे, नगरसेविका सुरेखा शितोळे, रोहिणी बनकर, सुनीता कुरुंदळे, आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशिकला काळे, अध्यक्षा सुनंदा लंघे, ऍक्टीव्ह सोशल ग्रुपच्या अध्यक्षा कामिनी बाफना, रामलिंग महिला संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे, ऍड सीमा काशीकर, वैभवी महिला बचत गटाच्या अध्यक्षा राजश्री ढमढेरे, युवा स्पंदनच्या अध्यक्षा प्रियांका धोत्रे, डॉ. मनीषा चोरे, अनघा पाठक, नंदा खैरे, विक्रांत थोरात आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, जिजाऊंच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. भगव्या साडया, भगवे फेटे घालून तसेच जिजाऊच्या वेशभूषेत येथील जिजाऊच्या लेकी मिरवणुकीत सहभागी झाल्या. मंजुश्री थोरात यांनी प्रास्ताविक केले, शिल्पा बढे यांनी स्वागत केले वर्षा नारखेडे यांनी सूत्रसंचालन केले. अलका ढाकणे यांनी आभार मानले. डॉ. स्मिता बोरा यांनी जिजाऊंच्या संभाषण कौशल्यावर व्यक्तिरेखा साकारली.
तावरे, ताठे, वाखारे यांचा सन्मान
नलिनी तावरे यांना राजमाता जिजाऊ, न्यायाधीश अक्षय ताठे यांना छत्रपती शिवराय महाराज, वात्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा वाखारे यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.