पुणे – खराडी येथील गुंड शैलेश घाडगे याचा सोमवारी पहाटे पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून खुन करण्यात आला. युवान आय टी पार्क जवळील नैवेद्यम हॉटेल शेजारील मोकळ्या जागेत हा प्रकार घडला. घाडगेला मागीलवर्षी तडीपारही करण्यात आले होते. तसेच त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही केली गेली होती. दरम्यान काही दिवसांपुर्वीच शैलेस हा भाजप पक्षात दाखल झाला होता अशी असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
घाडगे हा चंदननगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. घाडगे याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांना हा प्रकार लक्षात आला.
त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविली. चंदननगर पोलीस घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान गुन्हे शाखेसह चंदननगर पोलिसांची पथके गुन्हेगारांच्या मागावर आहेत.
शैलो घाडगे हा सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावर तडीपारीची कारवाईही करण्यात आली होती. त्याच्या खूनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र गुन्हेगार लवकरच सापडतील इतकी माहिती मिळाली आहे.
– पंकज देशमुख (पोलीस उपायुक्त)