Mumbai Local Train Girl Dance – कधीकधी रील बनवण्याच्या नादात लोक वेळ, ठिकाण आणि परिस्थितीकडे दुर्लक्ष करतात. लोकल ट्रेनपर्यंत लोकांच्या डान्सचे व्हिडिओ आणि काही खासगी क्षण व्हायरल होत असतात. दरम्यान, मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना एका मुलीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती तरुणी एका भोजपुरी गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसत आहे.
रेल्वेने दखल घेतली –
तरुणीच्या डान्समुळे डब्यात बसलेल्या प्रवाशांना खूपच अस्वस्थ वाटत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या डान्स व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे रेल्वेच्या एक्स हँडलने या प्रकरणाची दखल घेतली आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाने मध्य रेल्वे सुरक्षा विभागाला या घटनेची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Now I know why railways stocks are skyrocketing pic.twitter.com/HBaExbats4
— desi mojito 🇮🇳 (@desimojito) February 23, 2024
चालत्या ट्रेनमध्ये डान्सचा निषेध –
एका यूजरने लिहिले की, “मुंबई लोकल ट्रेनमध्ये अश्लील नृत्य करणे नक्कीच अयोग्य आहे. त्याचवेळी, एका युजरने लिहिले की, तरुणीला मोठा दंड ठोठावण्यासोबतच कठोर कारवाई करण्याचीही गरज आहे.
नर्स ऑपरेशन थिएटरमध्ये रील बनवत होती –
दरम्यान यापूर्वी, छत्तीसगडमधील डीकेएस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये व्हिडिओ रील्स बनवण्याचे प्रकरण समोर आले होते. काही परिचारिका ऑपरेशन थिएटरमध्ये रील बनवत होत्या. याप्रकरणी कारवाई करत रुग्णालय व्यवस्थापनाने परिचारिका पुष्पा साहू, तेजकुमारी साहू आणि तृप्ती दसर यांना बडतर्फ केले होते.