मुंबई – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष देत आहेत. अशात आदित्य ठाकरेंचा फोटो वापरून लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. समोर आलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरा करायला सुरुवात केली होती.तसेच नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते.
आदित्य ठाकरे यांच्या नावाने लोकांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या प्रोफाईल पिक्चरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो लावून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.
Mumbai | Complaint registered against an unknown person under Sections 417, 419, 511, 66 (C), 66 (D) of the IPC for impersonating Shiv Sena leader Aaditya Thackeray by putting his photo as WhatsApp display pic and cheating people. Further probe is on: Dadar police
— ANI (@ANI) August 28, 2022
Sections 417, 419, 511, 66 (C), 66 (D) या कलमानांतर्गत अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.