Ranji Trophy 2023-24, Mumbai vs Vidarbha Final : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 41 वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना झाला. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला.
त्यानंतर दुसऱ्या डावात मुंबईने 418 धावा केल्या आणि त्यांची एकूण आघाडी 537 धावांची झाली आणि विदर्भासमोर 538 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात 368 धावांत सर्वबाद झाला. यासह मुंबईने हा सामना 169 धावांनी जिंकला आणि मुंबईचे रणजीमध्ये हे विक्रमी 42वे विजेतेपद ( Mumbai won the Ranji Trophy title ) ठरले.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने चमकदार कामगिरी केली. त्यासाठी मुशीर खान, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांनी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला. मुशीरने दुसऱ्या डावात शतक झळकावले होते. अय्यरने 95 धावांची खेळी केली होती.
𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 are WINNERS of the #RanjiTrophy 2023-24! 🙌
Mumbai Captain Ajinkya Rahane receives the coveted Trophy 🏆 from the hands of Mr Ashish Shelar, Honorary Treasurer, BCCI. 👏 👏#Final | #MUMvVID | @ShelarAshish | @ajinkyarahane88 | @MumbaiCricAssoc | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/LPZTZW3IV4
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 14, 2024
मुंबई पहिला डाव…
मुंबईची सुरुवात खराब झाली. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात सर्वबाद 224 धावा केल्या. यादरम्यान पृथ्वी शॉने 46 धावांची खेळी केली. तर भूपेन लालवानी 37 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर एकही फलंदाज जास्त वेळ मैदानावर राहिला नाही. मात्र शार्दुल ठाकूर मुंबईसाठी संकटमोचक ठरला. त्याने 69 चेंडूंचा सामना करत 75 धावा केल्या. शार्दुलने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. मुंबईच्या पहिल्या डावात विदर्भाकडून यश ठाकूर आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. उमेश यादवने 2 बळी घेतले.
विदर्भाचा पहिला डाव 105 धावांवर गारद…
विदर्भाच्या फलंदाजांनी पहिल्या डावात सस्पशेल शरणागती पत्कारली. विदर्भाचा संघ अवघ्या 105 धावा करून सर्वबाद झाला. अक्षय वाडकर कर्णधार असलेल्या विदर्भाकडून यश राठोडने सर्वाधिक 27 धावा केल्या. करुण नायर शून्यावर बाद झाला. अथर्व तायडे 23 धावा करून बाद झाला. विदर्भाच्या पहिल्या डावात मुंबईकडून शम्स मुलाणी, तनुष कोटियन आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले.
WPL 2024 ( #DCvGG Match 20 ) : गुजरातवर विजय मिळवत दिल्लीनं गाठली अंतिम फेरी…
दुसऱ्या डावात मुशीर-अय्यरची चमकदार कामगिरी….
मुंबईने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले. संघाने सर्वबाद 418 धावांपर्यंत मजल मारली. यादरम्यान मुशीर खानने शतक झळकावले. त्याने 326 चेंडूंचा सामना करत 136 धावा केल्या. मुशीरच्या या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. श्रेयस अय्यरने 111 चेंडूंचा सामना करत 95 धावा केल्या. शम्स मुलानी 50 धावा करून नाबाद राहिला. कर्णधार अजिंक्य रहाणेने 73 धावांची खेळी केली. यादरम्यान विदर्भाकडून हर्ष दुबेने सर्वाधिक 5 बळी तर यश ठाकूरने 3 बळी घेतले.
𝙒𝙝𝙖𝙩 𝘼 𝙈𝙖𝙩𝙘𝙝! 👌 👌
The @ajinkyarahane88-led Mumbai beat the spirited Vidarbha to win their 42nd #RanjiTrophy title 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/L6A9dXXPa2#Final | #MUMvVID | @IDFCFIRSTBank | @MumbaiCricAssoc pic.twitter.com/pZITukmm84
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 14, 2024
अक्षयचे ठरले शतक व्यर्थ…
मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला विदर्भाचा संघ 368 धावांवर आटोपला. विदर्भाकडून कर्णधार अक्षयने शतक झळकावले. त्याने 199 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 102 धावा केल्या. हर्ष दुबेने 65 धावांची खेळी केली. विदर्भाच्या दुसऱ्या डावात मुंबईकडून गोलंदाजीत तनुष कोटियनने सर्वाधिक 4 बळी घेतले. तुषार देशपांडेने 2 गडी बाद केले. मुशीर खाननेही 2 बळी घेतले. अशाप्रकारे विदर्भाला 169 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.