मुळशी : सरपंच, उपसरपंच निवडीची तारीख जाहीर

पौड – नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक आणि सरपंच व उपसरपंच निवड करण्यासाठी मुळशी तालुक्‍यात 45 ग्रामपंचायत करिता सरपंच व उपसरपंच निवडीसाठी 9 आणि 10 फेब्रुवारी ही तारीख अंतिम करण्यात आलेली आहे. असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढला आहे. या आदेशाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी पुणे जिल्ह्यातील तहसीलदार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.

यामध्ये 9 फेब्रुवारी रोजी भोईणी, रिहे, शेरे, मुठा, भुकूम, चांदे, नानेगांव, मुलखेड, जांबे, काशिग, घोटावडे, कासारआंबोली, पौड, अंबडवेट, मारूंजी, कासारसाई, हिंजवडी, नांदे, माण, लवळे, उरवडे, चिंचवड, वाळेण ह्या 23 ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पद निवड होईल. तर 10 फेब्रुवारीला बोतरवाडी, खांबोली, मांदेडे, आंदेशे, हाडशी, भरे, चाले, आंदगांव, कोळावडे, नेरे, भालगुडी, कातरखडक, नांदगांव, साठेसाई, कुळे, मुगावडे, दखणे, चिखलगांव, खेचरे, अकोले, कोळवण, आंबेगांव ह्या 22 ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच निवड होणार आहे. मुळशी तालुक्‍यातील एकूण 45 ग्रामपंचायत पैकी 36 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते. याची मतमोजणी 18 जानेवारी रोजी झालेली होती. तर 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.