मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली, पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल

लखनऊ : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची पुन्हा एकदा प्रकृती बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी गाजियाबाद येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुलायम सिंग यांना शुगर आणि यूरिनचा त्रास आहे. सध्या त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना मंगळवारी पुन्हा रूग्णालयात दाखल केले जाऊ शकते. मंगळवारी त्याचं आॅपरेशन होऊ शकतं. रूग्णालयात दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत सपा नेते धर्मेंद्र यादव उपस्थित होते.

दरम्यान, याआधीही 10 जून रोजी मुलायमसिंग यादव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादव यांना हाय ब्लडप्रेशर आणि हाय शुगर आहे. यामुळे त्यांना त्रास झाला होता. त्यांची प्रकृती गेल्या काही वर्षांपासून ठिक नसते. त्यांना जास्त धावपळ सहन होत नाही. यामुळे ते अनेक कार्यक्रमांनाही गैरहजर असतात.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×