विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे 

मुंबई –  विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आज शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे यांच्या नियुक्तीबाबत आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी अधिकृत घोषणा केली असून त्या विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
तत्पूर्वी, नीलम गोऱ्हे यांनी २०१५मध्ये देखील विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज केला होता मात्र त्यावेळी त्यांनी माघार घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.