मुंबई – RRR फेम राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कोनिडेला काही दिवसांपूर्वीच आई-वडील झाले आहेत. राम आणि उपासना यांच्या घरी एका परीचे आगमन झाले. अभिनेत्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगताच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. रिपोर्ट्सनुसार,कीच्या येण्यानं घरात आनंदाचं वातावरण आहे. आज रामचरण आणि उपासना यांच्या लेकीचं थाटामाटात बारसं करण्यात आलं.
View this post on Instagram
त्यांनी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राम चरण आणि उपासना यांच्या मुलीला सोन्याचा पाळणा भेट दिल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.. हा सोन्याचा पाळणा खूपच महाग असल्याचे बोलले जात आहे. याची किंमत १ कोटी असल्याचं बोललं जात आहे. पण अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दुसरीकडे, उपासना तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये चाहत्यांसाठी या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहे. रामचरणचा टॉलीवूडमध्ये चाहतावर्ग मोठा आहे. त्याला मुलगी झाल्याचे कळताच चाहत्यांनी देखील याचा मोठा आनंद साजरा केला होता. त्याच्या मुलीचे नाव क्लिन कारा कोनिडिला असे असून ते ललिथा सहस्त्रनाममधून घेतले आहे. त्याचा अर्थ पूर्ण बदल असा होतो. अशा वेगळ्या नावामुळे रामचरण आणि उपासना हे चर्चेत आले आहे. चिरंजीवी यांनी देखील आजोबा झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता.