Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हिंदीसह तिच्या साऊथ चित्रपटांमुळे देखील चांगलीच चर्चेत असते. नुकताच तिचा ‘आँख मिचोली’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. मात्र आता ती तिच्या चित्रपटामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मृणाल ठाकूर एका तेलुगू अभिनेत्याच्या प्रेमात असल्याचे म्हंटले जात आहे. तसेच दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे.
नुकतेच एका पुरस्कार सोहळ्यात अल्लू अरविंद यांच्या हस्ते मृणालला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी अल्लू अरविंद यांनी तिला लग्नासाठी आशीर्वाद दिले. त्यानंतर तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, लग्नाबाबत मृणाल एका मुलाखतीत म्हणाली होती की, “माझा लग्नावर विश्वास आहे. माझ्या आजूबाजूला अनेक यशस्वी विवाह आहेत. ते एकमेकांसाठी बनलेले आहेत. आपल्याला असे वाटते की आपण आपल्यासाठी असलेल्या व्यक्तीशी लग्न केले पाहिजे.”
पुढे ती म्हणाली, “तुम्ही ही व्यक्ती 18, 20 वर्षांची असताना किंवा 30 ते 60 वर्षांचे असताना देखील शोधू शकता. लग्नासाठी योग्य व्यक्ती शोधण्याचे योग्य वय नसते. माझ्या मते, जर तुम्हाला योग्य व्यक्ती सापडली तर तुम्ही थांबू नका आणि लग्न करण्यास तयार व्हा.”
दरम्यान, अनेक दिवसांपासून मृणाल एका साऊथ अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र मृणालने याबाबत खुलासा केला आहे. मृणालने लग्नाच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे. एक व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली की, “ह्या अफवा किती मजेदार आहे हे मी सांगू शकत नाही. मला कंट्रोल करता आले नाही. लग्न लवकरच होईल, मुलगा स्वतः शोधा आणि ठिकाण मला सांगा,” असे ती व्हिडीओमध्ये सांगितले आहे.