Ira Khan – बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानची लेक आयरा खानने गेल्या वर्षी एंगेजमेंट केली होती, त्यानंतर चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे. इरा खान तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत जानेवारी 2024 मध्ये लग्नगाठ बांधणार आहे. याआधी या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू झालेय, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
आमिर खान आपल्या मुलीच्या लग्नासाठी खूप उत्सुक दिसत आहे. अलीकडेच इरा खान आणि नुपूरच्या लग्नाची सुरुवात केळवण सोहळ्याने झाली. या जोडप्याने सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहे. चाहत्यांनाही हे फोटो खूप आवडत आहे.
इराने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या केळवन सोहळ्यातील अनेक छायाचित्रे शेअर केली आहे. या कार्यक्रमात इराच्या काही मित्रांसह दोन्ही कुटुंबातील सदस्यही सहभागी झाले. खास प्रसंगासाठी, इराने पेशवाई नथ अन् साडी नेसली होती. केळवन सोहळ्यासाठी नुपूरने पारंपारिक लुक निवडला. इरा या लूकमध्ये सुंदर दिसत आहे.
केळवण फंक्शनमध्ये, वधू आणि वरच्या कुटुंबांना लग्नापूर्वी पारंपारिक जेवणासाठी एकमेकांना भेटावे लागते, जेणेकरून ते एकमेकांना लग्नासाठी आमंत्रित करू शकतील. यामध्ये दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटवस्तूही देतात. वधू आणि वरचे नातेवाईक देखील या कार्यक्रमात उपस्थित राहतात आणि विवाहित जोडप्यावर आशीर्वाद देतात आणि त्यांना भेटवस्तू देतात.