कौन बनेंगा खासदार चाय पे चर्चेतमध्ये येतीय रंगत
राजेंद्र वाघमारे
नेवासा – शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या राजकिय रणसंग्रमात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि उबाठा सेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात ही सरळ लढत होत आहे, महायुती आणि महाविकास आघाडीच्यावतीने दोन आजी – माजी खासदारांत होत असलेली ही लढत पक्ष आणि आघाडींपेक्षा वैयक्तीक गाठीभेटी घेतायत. त्यानुसार आपले राजकिय जुगाड जमविण्यासाठी दोन आजी – माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे सध्या शिर्डी मतदार संघातील नेवाशापासून अकोलेपर्यंत आपापली राजकिय फिल्डिंग लावण्यावर भर देत आहेत.
शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या या निवडणूकीत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना शेवटच्या क्षणी माञ पहिल्याच यादीत उमेदवारी जाहिर झाली. माजी खासदार वाकचौरे यांनी उबाठा सेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केल्यापासून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतांना महाविकास आघाडीत ही उबाठा सेनेची जागा कॉंग्रेसकडे घेण्यासाठी शेवटच्या क्षणांपर्यत प्रयत्न सुरु होते. माञ कॉंग्रेसला ही जागा मिळविण्यात अखेर यश आलेले नाही.
त्यामुळे कॉंग्रेसच्या गटात नाराजीचा सुरु असून राज्य महिला आयोगाच्या सदस्या वरिष्ठ कॉंग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी बहूजन वंचित आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यामुळे शिर्डीच्या राजकारणात चर्चेचे काहूर पेटलेले आहे. सद्या स्थितीत दोन सेनेत होणारी ही लढत दिसत असली तरी उत्कर्षा रुपवते यांच्या राजकिय भूमिकेवर राजकिय निरिक्षकांच्या नजरा लावून आहेत. त्यांनी शिर्डीच्या राजकिय रणांगणात उमेदवारी करुन लढत दिल्यास त्यांच्या उमेदवारीवर राजकिय नफ्या तोट्याच्या भूमिकेकडे दिग्गज नेत्यांचे लक्ष लागून आहे त्यामुळे दोन – आजी – माजी खासदारांत होणारी लढत ऐनवेळी उत्कर्षा रुपवतेंनी राजकिय मैदानात उडी घेवून उमेदवारी केली तर त्याचा फटका नेमका महाविकास आघाडीला बसणार का? असा सवालही चर्चिला जात आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते मतदार संघातील वारे ओळखून वेट अँण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत तर रुपवते या उच्च शिक्षित आणि राजकिय वारसा असलेल्या बड्या नेत्या असूनही त्यांना तरुणपणात चालून आलेली संधी जागा वाटपात उबाठा सेनेकडे गेल्यामुळे कॉंग्रेस नेत्यांचे मंञ बोध झालेले आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांत वाकचौरे यांच्या उमेदवारीमुळे राजकिय खदखद निर्माण झाली असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवारी शिर्डीच्या मैदानात सुसाट असल्याच्या जनसामान्यांच्या प्रतिक्रिया मिळत असल्यामुळे खासदार लोखंडे यांची हॅट्रिक होणार असल्याच्या चर्चा जोरदारपणे रंगू राजकिय आखाड्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.