राजेंद्र वाघमारे
नेवासा – जनहिताच्या सामाजिक प्रश्नाचा बागुलबुवा उभा करुन एका सत्ताधारी राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने जनतेच्या समस्याला न्याय मिळण्यापेक्षा उपोषणाचा देखावा मांडून केवळ स्वार्थ साधला गेल्यामुळे या नेवासा तहसिल कार्यालयासमोर झालेल्या उपोषणाची खमंग राजकिय चर्चा तालुक्यात मोठा चवीने सुरु झाली आहे इकडे उपोषण अन् तिकडे सेटलमेंट झाल्याची जोरदार चर्चा या मांडलेल्या उपोषणातून सुरु झाली आहे़.
याबाबत अधिक सविस्तर मिळालेले वृत्त असे की,एका सत्ताधारी राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने जनहिताचा मुद्दा मांडत जनतेला ञास नको ? असे कळवळा दाखून आपल्या बगलबच्च्यांना तहसिल कार्यालयासमोर भव्य शामियाना उभारुन दिला इकडे कार्यकर्त्यांनी उपोषण उपोषण सुरु केले आणि तिकडे’ त्या’ पदाधिकाऱ्याने सेटलमेंट करुन उपोषण गुंडाळून घेतल्यामुळे या पदाधिकाऱ्याला स्वता:च्या फायद्यासाठी जनतेच्या प्रश्नांचे भांडवल आणि बागुलबुवा उभा करुन आंदोलनातून स्वार्थ साधला गेल्यामुळे या पदाधिकाऱ्याची जनतेतून चांगलीच टिंगल उडविली जात आहे.
तहसिल कार्यालयात आल्यानंतर एखादा मोठा पुढारी असल्यासारखे दाखवून अधिकाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या या पदाधिकाऱ्याने तहसिल कार्यालयासमोर मंडप टाकून दुसरीकडे तडजोड केल्यामुळे या कार्यकर्त्याचा काळा चेहरा समोर आला असल्यामुळे कार्यकर्तेही चांगलेच आवा्क झाले आहे.