थिरुअनंतपुरम – पती-पत्नीच्या संसारात दोघांमधील शारिरीक आणि भावनिक संबंधांतील मतभेद अनेकदा विभक्त होण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. पत्नीच्या मनाविरुद्ध पती काही गोष्टी करत असतात. तर कधी पत्नी पतीविरुद्ध वागते. त्यामुळे संबंध खराब होतात आणि वाद घटस्फोटापर्यंत जातात. मात्र केरळमधून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एक पती आपल्या पत्नीसोबत सैतानाप्रमाणे वागला.
केरळ उच्च न्यायालयातून हे प्रकरण समोर आलं आहे. येथे पीडित महिलेने घटस्फोटासाठी अर्ज सादर केला आहे. पीडित महिलेने घटस्फोटाची कारण आज न्यायालयात मांडली. त्यावेळी उपस्थितांच्या अंगावर अक्षरश: काटा आला होता.
पीडित पत्नीने कोर्टासमोर आपली करुण कहाणी सांगितली. पीडितेने सांगितलं की, लग्नाना 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षांत महिलेच्या वडिलांनी तिच्या पतीला तब्बल 77 लाख रुपये दिले आहे. लग्नानंतर त्याने वैद्यकीय नोकरी सोडली आणि रियल इस्टेट आणि कंस्ट्रक्शनचा बिजनेस सुरू केला. ज्यात त्याला यश आलं नाही. पैशांव्यतिरिक्त पती आपल्याला शारिरीक त्रास देत होता, असंही महिलेने सांगितलं.
पीडितेने पुढे सांगितलं की, ज्या दिवशी माझ्या आईचा मृत्यू झाला होता, त्यादिवशी पतीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. अनेकदा पतीने आपल्या मनाविरुद्ध शारिरीक संबंध ठेवले. कधी तर अनैसर्गिक संबंध ठेवण्याची जबरदस्तीही केली जात होती. एकेदिवशी खूप आजारी असताना पतीने आपल्यासोबत जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवल्याचे पीडितेने म्हटलं.
कहर म्हणजे पतीने एकदा स्वत:च्या मुलासमोरच आपल्यावर वैवाहिक बलात्कार केल्याचे पीडितेने नमूद केले. तर पतीने पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. एकूण घटनाक्रम ऐकल्यानंतर न्यायालयाने या जोडप्याला घटस्फोट मंजूर केला.