पुणे – पती- पत्नीच्या वादातून तरुणाने पोलीस चौकीसमोर येऊन ब्लेडने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना शुक्रवारी फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमोर घडली आहे. सलमान अत्तार असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानची दोन लग्न झाली असून त्याच्यासोबत एकच पत्नी राहते. दारू पिल्यानंतर त्याने तिलाही मारहाण केली होती. त्याच रागातून पत्नी गणेश पेठेत माहेरी निघून गेली. मात्र, पत्नी मिसिंग असल्याची तक्रार घेऊन सलमान पोलीस चौकीत गेला. तिथे पोलिसांनी त्याच्या पत्नीला फोन लावला असता, तिने माहेरी गेल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला घरी जायला सांगितले. त्याच रागातून त्याने शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमोर स्वतः वर ब्लेडने वार आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.