1 कोटीपेक्षा अधिक उत्पन्न; करदात्यांच्या संख्येत वाढ

पुणे – प्रत्यक्ष कर मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मूल्यांकन वर्ष 2018-19 या वर्षात 1 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांच्या संख्येत 20 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन ती 97,689 इतकी झाली आहे. मूल्यांकन वर्ष 2017-18 मध्ये 1 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या 81,344 होती.

कर देणाऱ्या कंपन्या, संस्था, अविभक्‍त हिंदू कुटुंब व व्यक्‍तीच्या संख्येतही 19 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन अशा कर दात्यांची संख्या 1 लाख 67 हजार इतकी झाली आहे. 15 ऑगस्ट 2019 पर्यंत देशातील करदात्यांनी दाखल केलेल्या विवरणाच्या आकडेवारीनंतर प्रत्यक्ष कर मंडळाने ही माहिती जाहीर केली.

सरलेल्या वर्षात 5 कोटी 52 हजार व्यक्‍ती 11 लाख 30 हजार हिंदू अविभक्‍त कुटुंब, 12 लाख 69 हजार संस्था आणि 8 लाख 41 हजार कंपन्यांनी विवरण सादर केले आहे. नोटाबंदीनंतर केंद्र सरकार रिझर्व्ह बॅंक आणि कर विभागाने डिजिटल व्यवहार वाढावे याकरिता प्रयत्न केले आहेत. या कारणामुळे खर्च करणाऱ्यांची माहिती आता डिजिटल स्वरुपात उपलब्ध होत आहे. त्यामुळे करदात्यांच्या संख्येत आणि करदात्यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.