2005 मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’ने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या केमिस्ट्रीने आणि त्यांनी सगळ्यांना उल्लू बनवण्यासाठी वापरलेल्या फंड्याने पब्लिक येकदम खूष झालं होतं. लवकरच ‘बंटी और बबली’चा सिक्वेल येणार असून यामधील स्टारकास्टवरून चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. सिक्वेलमध्ये सैफ अली खानऐवजी आर माधवन या चित्रपटात झळकणार आहे.
माध्यमांच्या वृत्तांनुसार, ‘बंटी और बबली’च्या सिक्वेलमध्ये अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी भूमिका निभावणार होते. तर सैफ अली खानने चित्रपटातून माघार घेतली असल्याने त्याच्या जागेवर आर माधवन दिसणार आहे. याशिवाय बंटी और बबलीमध्ये गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी, शर्वरी वाघही दिसणार आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण वी शर्मा करणार आहेत.
वर्क फ्रंटच्या बाबतीत बोलायचे तर “बंटी और बबली’मधील केवळ अमिताभ बच्चन यांच्याच नावाने दरवर्षी 1-2 सिनेमे झळकत आहेत. अभिषेक आणि राणी मुखर्जी यांनी तर गेल्या 10 वर्षांपासून जणू काही करिअरमध्ये ब्रेक घेतला आहे. अलिकडच्या काळात त्यांचे कोणतेच सिनेमे रिलीज झालेले नाहीत.
सध्या राणी मुखर्जी “मर्दानी -2’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 2014 मध्ये आलेल्या तिच्या “मर्दानी’चा हा दुसरा भाग असणार आहे. तर अभिषेकने अनुराग कश्यपच्या “मनमर्जियां’मध्ये काम केले होते. दरम्यान, आता “बंटी और बबली 2’मध्ये “कजरारे कजरारे…’ म्हणायला ऐश्वर्या आहे की नाही हे नाही समजले.