लाहोर – पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू महंमद हाफीज याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हाफिजने यापूर्वी 2018 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो यापुढील काळात पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीसीएल) लाहोर कलंदर्सकडून खेळत राहणार आहे.
त्याने पाकिस्तानकडून 392 आंतरराष्ट्रीय सामने खेळले त्यात त्याने 12 हजार 789 धावा केल्या असून 253 बळी घेतले आहेत. हाफिजने 55 कसोटी, 218 एकदिवसीय आणि 119 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
त्याने 2003 साली झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टी-20 विश्वकरंडकात यंदा उपांत्य फेरीत खेळलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना त्याचा अखेरचा सामना ठरला आहे.