Mohammad Hafeez: सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोघांमध्ये दोन कसोटी सामने खेळले गेले असून तिसरा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर 3 जानेवारीला खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. मात्र आता पाकिस्तान संघाचा संचालक मोहम्मद हाफिज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मोहम्मद हाफिजला सिडनीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बसण्यापासून रोखण्यात आले.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा सामना सिडनी येथे होणार आहे. यासाठी संघ मेलबर्नहून सिडनीला रवाना झाला. पण मोहम्मद हफीजचे मेलबर्न ते सिडनीचे विमान चुकले. हाफिजला टीमसोबत मेलबर्नहून सिडनीला जायचे होते, पण फ्लाइट चुकल्यामुळे तो टीमसोबत जाऊ शकला नाही. हाफिज पत्नीसोबत सिडनीला जाण्यासाठी मेलबर्न विमानतळावर पोहोचला होता.
पण मोहम्मद हफीज त्याच्या बायकोसोबत कॉफी पीत बसल्याने त्यांनी विमनाची वेळ न तपासल्याने त्यांचे विमान चुकले. हाफिज वेळेवर विमानतळावर पोहोचला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखले. मात्र, काही वेळाने हाफिज पत्नीसह दुसरे विमान घेऊन सिडनीला पोहोचला.
Mohammad Hafeez and his wife missed his flight to Sydney? The news doing rounds reminded me how it’s a nightmare for me and I’m always anxious before my flight 🛫 #MohammadHafeez pic.twitter.com/StBzlSub0X
— Alisha Imran (@Alishaimran111) January 1, 2024
पाकिस्तानचा दोन सामन्यात पराभव
पाकिस्तानने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावले आहेत. येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव केला होता. यानंतर मेलबर्नमध्ये दुसरा सामना खेळला गेला, जिथे ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी विजय मिळवला. मालिकेतील अखेरचा सामना म्हणजे पाकिस्तानसाठी अस्तित्वाची लढाई आहे. 3 ते 7 जानेवारीदरम्यान तिसरी कसोटी खेळली जाणार आहे.