मोदींचा पुण्यात मुक्‍काम; पण सभा नाही ?

बारामती, पुण्यासाठी सभेबद्दल अजूनही “सस्पेन्स’

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी पुणे मुक्कामी असणार आहेत. मात्र, ते पुणे आणि बारामती लोकसभा मतदरसंघासाठी सभा घेणार, की नाही? हे अद्याप निश्‍चित झाले नसल्याचे भाजप पदाधिकारी सांगत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी (बुधवारी) अकलूज येथे सकाळी 9 वाजता सभा असल्याने ते पुणे मुक्कामी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान मोदी अग्रस्थानी आहेत. देशभरात त्यांच्या सुमारे 150 सभा होणार असून प्रामुख्याने जेथे भाजप उमेदवार अडचणीत अथवा निवडून येण्याची शक्‍यता नाही, अशाच ठिकाणी या सभा निश्‍चित करण्यात येत आहेत. तर, मोदी यांची दि.10 एप्रिल रोजी बारामतीमध्ये सभा होणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आले. मात्र, ती सभा अचानक रद्द करत नवीन वेळ नंतर कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर आता 17 एप्रिल रोजी मोदी यांची अकलूज येथील सभेची घोषणा करण्यात आली आहे. ही सभा सकाळी 9 वाजता होणार असल्याने ते पुण्यात येऊन पुढे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुण्यात गरज नसल्याचा दावा
दरम्यान, या माहितीस भाजप पदाधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला असला, तरी ज्या लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार निश्‍चित विजयी होईल, अशा ठिकाणी त्यांच्या सभा होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुणे आणि बारामती दोन्ही मतदारसंघात त्यांच्या सभा होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, या दाव्यामुळे माढा मतदारसंघात भाजपला विजयाची खात्री नसल्याचे बोलले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.