नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती स्वतः बोरीस जॉन्सन यांनी आज दुपारी ट्विटरद्वारे दिली.
अशातच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करत बोरीस जॉन्सन यांच्या नावे संदेश दिला आहे. आपल्या संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची प्रकृती लवकरच ठीक व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी लिहितात, “पंतप्रधान बोरीस जॉन्सन तुम्ही एक लढवय्ये नेते असून तुम्ही या कोरोना विषाणूला नक्कीच पराजित कराल. आपल्या व संपूर्ण ब्रिटनच्या सुदृढ आरोग्यासाठी सदिच्छा”
Dear PM @BorisJohnson,
You’re a fighter and you will overcome this challenge as well.
Prayers for your good health and best wishes in ensuring a healthy UK. https://t.co/u8VSRqsZeC
— Narendra Modi (@narendramodi) March 27, 2020